Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ‘नीट’ उद्याच, आणखी एक याचिका फेटाळली

‘नीट’ उद्याच, आणखी एक याचिका फेटाळली

SupremeCourtनवी दिल्ली, [३० एप्रिल] – २०१६-१७ मधील राष्ट्रीय पातळीवर होणारी नीट परीक्षा १ मे रोजी घेण्याच्या आदेशाविरोधात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शनिवारी फेटाळली असून निर्णय बदलण्यास कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
उद्या रविवारी १ मे रोजी होणारी ‘नीट’ची पहिल्या टप्प्यातील परिक्षा पुढे ढकलावी, अशी याचिका विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदण्यास नकार दिला असून उद्या ठरलेल्या दिवशीच ‘नीट’ होणारच, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वैद्यकीय, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ‘नीट’ घेतली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरसुद्धा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरही सुनावणी देण्यास नकार दिला आहे. या याचिकेत विद्यार्थ्यांनी सांगितले होते की सीबीएसई आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमात फार फरक आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात परिक्षेची तयारी होणार नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करत ‘तुम्हाला परिक्षेची तयारी करण्यापासून कुणीही रोखले नाही’ असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ मे २४ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर ‘नीट’ची परिक्षा होईल.
दरम्यान, या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय अन्यायकारक असल्याचेही म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28108

Posted by on Apr 30 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (400 of 2453 articles)


=विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण= मुंबई, [२९ एप्रिल] - राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ...

×