Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नीती आयोगाच्या कामकाजाला प्रारंभ

नीती आयोगाच्या कामकाजाला प्रारंभ

=पनगारिया यांनी स्वीकारली सूत्रे=
niti aayogनवी दिल्ली, [१२ जानेवारी] – पं. नेहरू यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या नीती आयोगाने आज सोमवारपासून आपल्या कामकाजाला औपचारिकपणे प्रारंभ केला. आयोगाचे उपाध्यक्ष आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ अरविंद पनगारिया यांनी आयोगाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय आणि माजी संरक्षण सचिव डॉ. व्ही. के. सारस्वत हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत.
नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून त्याऐवजी नीती आयोगाच्या स्थापनेची घोषणा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोगाचे अध्यक्ष आहेत, तर गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह हे चार केंद्रीय मंत्री पदसिद्ध सदस्य आहेत. सोबतच, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी हे विशेष निमंत्रित आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल हे आयोगाच्या कार्यसंचालन परिषदेचे सदस्य आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19590

Posted by on Jan 13 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2251 of 2453 articles)


=शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा= मुंबई, [१२ जानेवारी] - सामाजिक बांधिलकी जपून, व्यसनमुक्ती सारख्या अभियानासह विविध समाज जागृतीच्या कार्यात ...

×