Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » नीलेश राणे यांना अखेर अटक

नीलेश राणे यांना अखेर अटक

=पक्षकार्यकर्त्याचे अपहरण व मारहाण प्रकरण=
NILESH-RANEचिपळूण, [२० मे] – पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याचा आरोप असलेले कॉंगे्रसचे माजी खासदार नीलेश राणे यांना पोलिसांनी आज शुक्रवारी अटक केली.
या प्रकरणी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे पुत्र असलेले नीलेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यासाठी धाव घेतली होती. पण, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देताना २३ मे पूर्वी चिपळूण पोलिसांपुढे शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी आठ वाजता ते शरण येताच पोलिसांनी त्यांना अटक करून कोठडीत घेतले.
राणे शरण आले तेव्हा त्यांचे शेकडो समर्थकही पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले होते. तथापि, सर्व प्रक्रिया शांततेत पार पडल्याने कायदा व सुव्यवस्थेपुढे कोणतीही समस्या निर्माण झाली नाही.
मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना पोलिसांनी नीलेश राणे यांच्याविरुद्ध अतिशय गंभीर आरोप असल्याने कोठडीत घेऊनच चौकशी करणे सोयीचे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. याचवर्षीच्या एप्रिलमध्ये राणे आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी संदीप सावंत असे नाव असलेल्या कॉंगे्रस कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राणे यांनी बोलावलेल्या रॅलीत आपण हजर न राहिल्याने अपहरण करून मारहाण करण्यात आली होती, असा आरोप संदीप सावंतने केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28356

Posted by on May 21 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (310 of 2452 articles)


=९२ वर्षांचे अच्युतानंदन रुसले= तिरुवनंतपुरम्, [२० मे] - माकपा पोलिट ब्युरोचे वरिष्ठ सदस्य पी. विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री राहणार आहेत. ...

×