Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नॅशनल हेरल्ड : सोनिया, राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात

नॅशनल हेरल्ड : सोनिया, राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात

soniaGandhi_rahulGandhiनवी दिल्ली, [४ फेब्रुवारी] – ‘नॅशनल हेरल्ड’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बजाविलेल्या समन्सविरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
‘नॅशनल हेरल्ड’ ची दोन हजार कोटींची मालमता हडप केल्याचा आरोप सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनिया आणि राहुल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेबु्रवारीला होणार आहे. यासाठी त्यांना समन्स बजाविण्यात आले होते. या समन्सविरोधात सोनिया आणि राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी पुढील सुनावणीच्या वेळी कोणालाही कोणत्याही प्रकरणाची सूट देण्यात येऊ नये, अशी मागणी केलेली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26721

Posted by on Feb 4 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (862 of 2453 articles)


कॅलिफोर्निया, [४ फेब्रुवारी] - सोशल इंटरनेटमध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणून ओळख असलेल्या ‘फेसबुक’ चा आज १२ वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने ...

×