Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » नेट न्यूट्रॅलिटीला ट्रायचा पाठिंबा

नेट न्यूट्रॅलिटीला ट्रायचा पाठिंबा

=इंटरनेट कंपन्यांना धक्का=
traiनवीदिल्ली, [८ फेब्रुवारी] – नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन करीत भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने इंटरनेट कंपन्यांना विविध किमतींवर सेवा देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाने भारतात मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मोफत इंटरनेट पोहोचविण्यासाठी बनविण्यात आलेल्या फेसबुक इंकच्या योजनेला मोठा झटका बसला आहे.
इंटरनेट सेवा पुरविणार्‍या कंपन्यांच्या वेबसाईटला विविध किमतीत सेवा पुरविण्याची परवानगी मिळणार नाही, असे ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी स्पष्ट केले.
फक्त आणिबाणीच्या स्थितीतच असे करण्याची परवानगी आहे. म्हणजे इंटरनेट डॉट ओआरजीची अंमलबजावणी भारतात होणे शक्य नाही. फेसबुक प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी फ्री बेसिक्ससाठी अभियान सुरू केले होते आणि सोशल मीडिया यूजर्सला याच्या समर्थनासाठी ट्रायकडे अपील करण्यास सांगितले होते. नेट न्यूट्रॅलिटीवर बरेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. नेट न्यूट्रॅलिटीचे ट्रायने समर्थन केल्यामुळे इंटरनेटपासून लांब असणार्‍या लोकांपर्यंत मोफत इंटरनेट सेवा पुरविण्यास मदत होईल. सोबतच, ट्रायने वेगवेगळ्या किमतीत ही सेवा पुरविणार्‍या कंपन्यांवर प्रत्येक दिवसाला ५० हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26791

Posted by on Feb 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (842 of 2453 articles)


=३४,५५५ कोटींच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण= पारादीप (ओडिशा), [७ फेब्रुवारी] - एखादा राष्ट्रीय प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला पूर्णत्वाकडे नेताना प्रचंड विलंब ...

×