Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता!

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता!

=१९६४ पर्यंत जिवंत असल्याचा मिळाला पुरावा=
netaji subhashchandra boseनवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजवर न उलगडलेल्या मृत्यूचे रहस्य आता हळूहळू उलगडू लागले आहे. १९४५ मधील विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला असावा, हा आजवरचा समज खोटा ठरू लागला आहे. कारण, १९६४ पर्यंत ते जिवंत होते आणि भारतात परत आले होते, हे सिद्ध करणारे काही पुरावे बाहेर आले आहेत.
पश्‍चिम बंगाल सरकारने शुक्रवारी नेताजींशी संबंधित एकूण ६४ गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या होत्या. यात अमेरिकन गुप्तचर खात्यातील एका अधिकार्‍याने १९६० च्या दशकात तयार केलेल्या अहवालाचा समावेश आहे. यात असे स्पष्ट नमूद आहे की, नेताजी १९६४ पर्यंत जिवंत होते. फेबु्रवारी १९६४ मध्ये ते भारतात आले होते आणि त्यावेळी त्यांचे वय ६७ वर्षे होते.
विशेष म्हणजे, तायवानमधील तायहोकू येथे १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला होता, ही धारणा आजही भारतीयांच्या मनात कायम आहे. पण, या नव्या कागदोपत्री पुराव्यांवर विश्‍वास ठेवल्यास, या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता, असे दिसून येते. दरम्यान, नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दस्तावेजांची जी सीडी दिली आहेत, त्यातही १९४५ च्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागील रहस्य उलगडण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात ज्या गोपनीय फाईल्स आहेत, त्यादेखील सार्वजनिक करण्यात याव्या, अशी मागणी नेताजींच्या कुटुंबीतील सदस्यांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23921

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1439 of 2453 articles)


बिहारचे आणखी एक सर्वेक्षण महाआघाडी ७० जागांवरच थांबणार नवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआला १४० ...

×