Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नेताजींची हत्या स्टॅलिन यांनीच केली

नेताजींची हत्या स्टॅलिन यांनीच केली

=सुब्रम्हण्यम स्वामी यांचा गौप्यस्फोट=
Subramanian Swamy5कोलकाता, [११ जानेवारी] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाला नव्हता, त्यांची हत्याच झाली होती आणि ती पूर्वीच्या सोव्हियत रशियन महासंघाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांनी केली होती, असा गौप्यस्फोट भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. नेताजींच्या मृत्युवरील गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करण्याची विनंती आपण केंद्र सरकारला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताकडे असलेल्या कागदपत्रांनुसार, शत्रूंना गुंगारा देत नेताजी त्यावेळी चीनच्या मंचुरिया येथे पोहोचले होते. हा भाग त्यावेळी रशियाच्या ताब्यात होता. रशिया आपली मदत करेल असे नेताजींना वाटले होते. पण, स्टॅलिन यांनी त्यांना अटक करून सायबेरियातील तुरुंगात डांबले आणि १९५३ साली त्यांना फाशी दिली. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांना नेताजी सायबेरियाच्या याकुत्स्क तुरुंगात असल्याची माहिती होती, असा दावाही स्वामी यांनी केला. ते कोलकात्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
नेताजींच्या मृत्युसंदर्भातील गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करण्याची गरज आहे. असे केल्यास भारताचे रशिया आणि ब्रिटनसोबत असलेल्या संबंधात काही प्रमाणात कटुता येण्याची शक्यता असली, तरीही केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायलाच हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण ही मागणी करणार आहोत, असे स्वामी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19562

Posted by on Jan 11 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2258 of 2453 articles)


=आता रांग लावण्याची गरज राहणार नाही= मुंबई, [११ जानेवारी] - आपल्या तक्रारी घेऊन किंवा अन्य कामानिमित्त मंत्रालयाची पायरी चढणार्‍या महाराष्ट्रभरातील ...

×