Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींचे कुटुंबीय पंतप्रधानांना भेटणार

नेताजींचे कुटुंबीय पंतप्रधानांना भेटणार

  • १४ ऑक्टोबरला भेट निश्‍चित
  • पीएमओकडून सात वेळा दूरध्वनी
  • चर्चेतील अजेंडा ठरविण्याची सूचना

netaji subhashchandra bose3कोलकाता, [२० सप्टेंबर] – पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर नेताजींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान कार्यालयातून आतापर्यंत सात वेळा दूरध्वनी करण्यात आला आहेे. नेताजींच्या कुटुंबातील काही निवडक सदस्य येत्या १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. या भेटीत उपस्थित होणार्‍या मुद्यांची व्यवस्थित मांडणी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने या सदस्यांना केली आहे.
नेताजींचे पणतू चंद्र बोस यांना पीएमओतर्फे हे फोन करण्यात आले आहेत. पंतप्रधानांसोबतच्या भेटीत नेताजींच्या कुटुंबातील कोणते सदस्य उपस्थित राहणार आहेत, याबाबतची सविस्तर यादी पीएमओला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच, या भेटीत उपस्थित होणार्‍या मुद्यांची नीट मांडणी करून, त्यांचा अग्रक्रमही निश्‍चित करण्याचे आवाहन पीएमओकडून करण्यात आले आहे.
या भेटीसंदर्भात स्वत: पंतप्रधानही अतिशय गंभीर दिसत आहेत. या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय गृहसचिवांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काहीही प्रश्‍न असल्यास संबंधित सर्व अधिकार्‍यांनाही या बैठकीसाठी पाचारण केले जाऊ शकते.
पंतप्रधान मोदी यांचे कार्यालय आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे. आम्ही कुठेही मागे राहायला नको, यासाठी भेटीची परिपूर्ण आखणी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे चंद्र बोस यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या या भेटीसाठी बोस कुटुंबातील ३४ सदस्य आणि १४ संशोधक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पश्‍चिम बंगाल सरकारने अलीकडेच नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्समधून नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागील काही महत्त्वाची माहिती बाहेर येऊ लागली आहे. याच पार्श्‍वभूमीवर ही भेट होत असल्याने तिला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23967

Posted by on Sep 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1433 of 2453 articles)


=स्मृती इराणी यांचे कॉंगे्रसला खुले आव्हान, देशातील महिला कमकुवत नाहीत= अमेठी, [२० सप्टेंबर] - राजीव गांधी ट्रस्टवर शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावल्याचा ...

×