Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींच्या फाईल्स सार्वजनिक करण्याचा मुद्दा

नेताजींच्या फाईल्स सार्वजनिक करण्याचा मुद्दा

=सरकारने गठित केली उच्चस्तरीय समिती=
netaji subhashchandra boseनवी दिल्ली, [१५ एप्रिल] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू सूर्यकुमार बोस यांनी सोमवारी रात्री बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नेताजींबाबतच्या गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी केंद्र सरकारने या फाईल्स सार्वजनिक करता येऊ शकतात का, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे.
या समितीत आयबी, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. नेताजींच्या बेपत्ता होण्यामागील रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपले सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल, अशी हमी पंतप्रधानांनी सूर्यकुमार यांना दिली आणि बर्लिन येथूनच केंद्रीय गृहमंत्रालयाला समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
नेताजींबाबतच्या गोपनीय फाईल्स सार्वजनिक करता येऊ शकतात का, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करेल. समितीच्या अहवालाचा अभ्यास करून सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. दरम्यान, सरकारने आपल्या विनंतीवर तातडीने कारवाई करून समिती गठित करण्याच्या निर्णयाचे नेताजींच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आहे. मोदी सरकारकडून इतक्या तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षाही आम्ही केली नव्हती, असे चंद्र बोस यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22099

Posted by on Apr 15 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1786 of 2453 articles)


=डिझेलमध्ये १.३० रुपयांची कपात= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण झाल्यामुळे त्याचा फायदा ...

×