Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींविषयीच्या आणखी २५ फाईल्स सार्वजनिक

नेताजींविषयीच्या आणखी २५ फाईल्स सार्वजनिक

=राजधानीत भव्य स्मारक उभारणार, सरकारची घोषणा=
netaji subhashchandra boseनवी दिल्ली, [२९ एप्रिल] – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून शुक्रवारी करण्यात आली.
नेताजींचा मृत्यू झाला किंवा नाही आणि झाला तर कसा, याविषयीचे गूढ उकलण्याच्या दृष्टीने सरकारने नेताजींशी संबंधित आणखी २५ गोपनीय फाईल्सही सार्वजनिक केल्या. सार्वजनिक करण्यात आलेल्या फाईल्समध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि गृह मंत्रालयाच्या प्रत्येकी ५ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या १५ फाईल्सचा समावेश आहे.
देशातील जनता आणि विशेष करून युवावर्ग नेताजींचे जीवन, स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी केलेले योगदान याबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर बोलताना सांगितले. विविध संस्था आणि संसद सदस्यांची मागणी लक्षात घेता राजधानी दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांचे जीवन व स्वातंत्र्यलढ्यासह त्यांच्या गूढ मृत्यूविषयी माहिती मिळू शकेल. या स्मारकाचे कामही सुरू झाले आहे, असेही महेश शर्मा यांनी सांगितले.
नेताजींशी संबंधित दोन फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी जपानने दर्शविली असली तरी त्या देशाच्या ताब्यात असलेल्या आणखी तीन फाईल्सविषयी अशाप्रकारचे आश्‍वासन मिळू शकले नाही, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
नेताजींशी संबंधित १०० फाईल्स पहिल्या टप्प्यात २३ जानेवारी सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात २९ मार्च रोजी आणखी ५० फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या. आज शुक्रवारी त्यात आणखी २५ फाईल्सची भर पडली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28104

Posted by on Apr 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (402 of 2453 articles)


=अमृतसर, लाहोरमधूनही दिसणार= नवी दिल्ली, [२९ एप्रिल] - डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटारी-वाघा ...

×