Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींशी संबंधित फाईल्स कॉंंग्रेस सरकारने जाळल्या

नेताजींशी संबंधित फाईल्स कॉंंग्रेस सरकारने जाळल्या

netaji subhashchandra boseनवी दिल्ली, [३० मार्च] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स जाळण्यात किंवा नष्ट करण्यात आल्या, यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्यास सुरुवात झाली आहे. या फाईल्स कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातच जाळण्यात आल्या, असा दावा केंद्र सरकारने जारी केलेल्या दस्तावेजात करण्यात आला आहे
भाजपाने नेहमीच हा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे आणि पश्‍चिम बंगालच्या येत्या निवडणुकीतील राजकारण या मुद्यावरून नवे वळण घेईल, असे म्हटले जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स आणि त्यांच्या अस्थी लाल किल्ल्यात एका मेमोरियलमध्ये ठेवण्यासंदर्भातील दस्तावेज नष्ट करण्यात आले असल्याचे न्या. मुखर्जी आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
यातील बहुतांश फाईल्स ६० व ७० च्या दशकातील आहेत. फाईल क्रमांक (१२)२२६-पीएम ६ मार्च, १९७२ रोजी नष्ट करण्यात आली, तर फाईल क्रमांक २३(१५६) ५१ पीएमचे काही दस्तावेज नष्ट करण्यात आले असून, नेताजींच्या अस्थी टोकियो येथून दिल्लीच्या लाल किल्ल्यातील एका मेमोरियलमध्ये ठेवण्याबाबतची फाईल आता रेकॉर्डमध्ये नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने आयोगाला सांगितले आहे. दस्तावेज नष्ट करण्यात आले की ते गहाळ झाले, हे स्पष्ट नसल्याचेही यात म्हटले आहे.
१९५६ ते २००९ दरम्यानच्या नेताजींशी संबंधित ५० फाईल्स मंगळवारी उघड करण्यात आल्या आहेत. यातील १० पीएमओ, १० गृह मंत्रालय आणि ३० फाईल्स परराष्ट्र मंत्रालयाने उघड केल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27653

Posted by on Mar 31 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (545 of 2453 articles)


मुंबई, [३० मार्च] - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आपापल्या परीने कर्जावरील व्याजदर ठरवित असल्याने, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचे दर ...

×