Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सुरक्षित

नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सुरक्षित

=भाचा अभिजित रॉय यांचा दावा=
netaji subhashchandra boseकोलकाता, [१७ एप्रिल] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय बेपत्ता होण्यामागील कारणाचा शोध घेण्यात येत असताना आणि त्यांच्याशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक करता येऊ शकतात का, याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच उच्चस्तरीय आयोग गठित केला असताना, नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स कोलकात्यातील एका अज्ञात खोलीत सुरक्षित ठिकाणी बंद असल्याचा दावा नेताजींचा भाचा अभिजित रॉय यांनी केला आहे.
या फाईल्समध्ये १९४७ ते १९६८ या कालावधीत नेताजींवर पाळत ठेवलेल्या फाईल्सचा समावेश आहे, अभिजित रॉय यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात ज्या दोन फाईल्समुळे देशभर चर्चा झाली होती, त्या फाईल्स लॉर्ड सिन्हा रोडवरील विशेष विभागाच्या तिजोरीत बंद आहेत. या तिजोरीमध्ये अन्य ६२ फाईल्स असून, त्यातील माहिती सार्वजनिक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेतांजीवर पुस्तक लिहिणारे लेखक अनुज धर यांनीही रॉय याच्या मताचे समर्थन केले आहे. नेताजींच्या कुटुंबीयांवर नेहरूंच्या काळापासून पाळत ठेवण्यात आल्याचे प्रकरण गाजत आहे. नेताजींची पुतणी कृष्णा यांनीही या वादात उडी घेतली आहे. या प्रकरणातील गुप्ततेमुळे लोक आता जाहीरपणे चर्चा करीत असल्यामुळे सत्य बाहेर आणण्यासाठी या सर्व फाईल्स सार्वजनिक करण्यात याव्या, अशी मागणी कृष्णा बोस यांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22157

Posted by on Apr 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1774 of 2453 articles)


पंतप्रधानांचे ओजस्वी भाषण मोदी... मोदी... जयघोष मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या आठवणी ताज्या दहा हजार भारतीयांची उपस्थिती देशात चतुरंग क्रांती आणण्यास ...

×