Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » नेताजींसंबंधीच्या फाईल्स सार्वजनिक करणार

नेताजींसंबंधीच्या फाईल्स सार्वजनिक करणार

netaji subhashchandra boseकोलकाता, [११ सप्टेंबर] – रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक करण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शुक्रवारी जाहीर केला.
नेताजींशी संबंधित ज्या फाईल्स आपल्या सरकारच्या अखत्यारीत आहेत, त्या सर्वच सार्वजनिक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्याकडे एकूण ६४ फाईल्स आहेत. त्या सार्वजनिक करण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
नेताजींच्या रहस्यमय बेपत्ता होण्यामागील कारणांचा उलगडा करण्यासाठी सर्व गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्यात याव्या, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. नेताजींच्या कुटुंबीयांकडूनही ही मागणी सातत्याने होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौर्‍यातही नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मोदी यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी आपल्या कार्यालयाला फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. पण, अद्याप या फाईल सार्वजनिक झालेल्या नाहीत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगाल सरकारकडे असलेल्या फाईल्स सार्वजनिक करण्याची घोषणा केल्याने त्यातून नेमके काय बाहेर येणार आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23769

Posted by on Sep 11 2015. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (1483 of 2452 articles)


=लाखो लोकांनी छतावर घेतला आश्रय= टोकियो, [११ सप्टेंबर] - भूकंप आणि त्सुनामीच्या महाविनाशी लाटा यासारख्या नैसर्गिक संकटांचा नेहमीच सामना करणार्‍या ...

×