Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींसाठी आजपासून देशव्यापी ‘चेतना यात्रा’

नेताजींसाठी आजपासून देशव्यापी ‘चेतना यात्रा’

NETAJI SUBHASH CHANDRA BOSE CHETNA YATRAकटक, [१५ जानेवारी] – ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’ अशी गर्जना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘चेतना यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी कटक येथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, नेताजींच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला यात्रेचा समारोप होणार आहे.
उत्कल विकास परिषद नावाची एक संस्था गेल्या काही वर्षांपासून या यात्रेचे आयोजन करीत आहे. संस्थेने एक पत्रक जारी करून याविषयीची माहिती जारी केली आहे. या लढवय्या नेत्याचे जन्मस्थान असलेल्या कटक येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. ब्रिटिशांशी थेट लढाई करताना ज्या ठिकाणी त्यांनी निकराची झुंज दिली त्या इंफाळमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. एकूण १५०० किलोमीटर अंतराच्या या यात्रेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचे पुरस्कर्ते आणि त्यांचे चाहते सहभागी होणार आहेत.
नेताजींची नात जयंती बोस कटक येथील ओडिया बाजार या नेताजींचे मूळ निवासस्थान असलेल्या परिसरात यात्रेला हिरवी झेंडी दाखवणार असून ही यात्रा सात दिवस चालणार आहे. ‘नेताजींनी दिलेला साहस आणि राष्ट्राप्रति एकनिष्ठतेचा संदेश आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणाईची राष्ट्रउभारणीत महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्यापर्यंत नेताजींचे प्रेरणादायी विचार पोहचविणे आवश्यक आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष देवी प्रसाद प्रस्टी यांनी याबाबत माहिती देताना व्यक्त केले.
यात्रेत सहभागी झालेल्यांचे गट करण्यात आले असून ते कटक येथून कोलकाता, चेन्नई आणि मदुराई अशा विविध मार्गांनी गुवाहाटीला एकत्र येतील. मग गुवाहाटी ते इंफाळ ही यात्रा सर्व गट एकत्रितपणे करणार असल्याची माहिती प्रस्टी यांनी दिली आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यान १९४४ मध्ये नेताजींच्या नेतृत्त्वातील आझाद हिंद सेना आणि जपानच्या संयुक्त सैन्याने ब्रिटिश फौजांना कडवी झुंज दिली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19742

Posted by on Jan 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2224 of 2453 articles)


न्यूयॉर्क, [१५ जानेवारी] - २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी येथील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका अमेरिकन ...

×