Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्याच

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्याच

=माजी अंगरक्षकाचा दावा=
netaji subhashchandra boseनवी दिल्ली, [१६ एप्रिल] – आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले नसतानाच विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला नसून, त्यांची हत्याच झाली आहे, असा दावा नेताजींच्या एका माजी अंगरक्षकाने केला आहे.
हरयाणातील गुडगावस्थित आझाद हिंद सेनेतील शिपाई ९३ वर्षीय जगराम यादव यांनी हा दावा केला आहे. एक गनर म्हणून मी नेताजी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना स्वातंत्र्य लढ्याबाबत चर्चा करताना अनेकदा ऐकले आहे, असे त्यांचे मत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेताजींचा तिरस्कार करीत होते, असे बोलले जाते. याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना जगराम यादव म्हणाले की, १९४५ मध्ये आम्ही त्यावेळी चटगाव येथील तुरुंगात होते. अचानक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आले. आझाद हिंद सेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी माझ्या निधनाची अफवा पसरविली जाण्याची शक्यता आहे, असे नेताजींनी आम्हाला आधीच सांगितले असल्यामुळे आम्ही कुणीही या वृत्तावर विश्‍वास ठेवला नाही. वास्तवात नेताजी रशियातील सायबेरियात गेले होते आणि भारताच्या सर्वात मोठ्या कटकारस्थानाचा बळी ठरले. १९४५ मध्ये तायवानमध्ये एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचा प्रचार केला जातो, असेही ते म्हणाले.
भारत आणि परदेशात नेताजींची प्रतिमा आपल्यापेक्षा मोठी आणि मजबूत होईल, असे पंडित नेहरूंना वाटत होते. १९४९ मध्ये चीनच्या स्वातंत्र्यानंतर एक चिनी दूत चीनमधील भारतीत दूतावासात पोहोचला होता आणि नेताजी रशियात असून ते भारतात परतण्यास उत्सुक असल्याचे तो म्हणाला होता, असे १९४३-४४ या कालावधीत जवळपास १३ महिने नेताजींचे अंगरक्षक राहिलेल्या यादव यांनी सांगितले. तत्कालीन राजदूत के. एम. पनिकर उपस्थित नसल्यामुळे सैन्य अधिकारी ब्रिगेडिकर ठक्कर यांनी दूताची भेट घेतली होती. नेताजींबाबत मिळालेल्या या वृत्तामुळे अत्यानंद झालेल्या ठक्कर यांनी तत्काळ याबाबत नेहरूंना सूचना दिली. नेहरूंनी ठक्कर यांना पदासाठी लायक नसल्याचे सांगून दुसर्‍याच विमानाने परत बोलावले. आपला अनुभव आणि वास्तवाच्या आधारे आपण हे सत्य सांगत आहोत, असे सांगताना नेताजींची हत्याच करण्यात आली, अशी केवळ माझीच नव्हे तर माझ्या पिढीच्या अनेक लोकांची धारणा आहे, असेही यादव म्हणाले. १९४८ ते १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना यादव म्हणाले की, त्याबाबत मी काहीही सांगू शकणार नसलो तरी नेताजींची हत्याच झाली एवढे नक्की. ब्रिटिश सरकारने २२ फेब्रुवारी १९४६ रोजी बंडखोर ठरवून यादव यांना बडतर्फ केले होते. लष्करात ५-६ वर्षे नोकरी करताना द्वितीय विश्‍वयुद्धात भाग घेणार्‍या यादव यांना लढण्याचा मोबदला म्हणून फक्त २५ रुपये मिळत होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22127

Posted by on Apr 16 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1778 of 2453 articles)


=पेन्टॅगॉनने दिला इशारा= वॉशिंग्टन, [१६ एप्रिल] - युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर लष्कर-ए-तोयबासारख्या पाकस्थित अतिरेकी संघटना भारतावर मोठा अतिरेकी ...

×