Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध

नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध

=पंतप्रधान मोदी यांची ग्वाही=
narendramodi-pmनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात महाविनाशकारी भूकंपाने उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिली.
नेपाळचे उपपंतप्रधान विमलेंद्र निधी यांनी आज शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्याकडे भारताची भूमिका स्पष्ट केली. नेपाळमध्ये प्रचंड यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारचे विशेष दूत म्हणून निधी भारतात आले आहेत.
प्रचंड यांना भारतभेटीचे निमंत्रण
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्पा कमल दहाल ऊर्फ प्रचंड यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. द्विपक्षीय मैत्रीचे नाते आणखी मजबूत करण्यासाठी आपण शक्य तितक्या लवकर भारतात यावे, अशी आग्रहाची विनंती मोदी यांनी यावेळी केली.
या बैठकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आणि भारत-नेपाळ मैत्री या काळात आणखी मजबूत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. हे संबंध केवळ सरकारपुरतेच मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील नागरिकांच्या घट्ट मैत्रीचे आहेत. ते आपल्याला आणखी मजबूत करायचे आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29225

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (113 of 2453 articles)


=सुमित्रा महाजन यांचे आवाहन= जयपूर, [२० ऑगस्ट] - समान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे. या देशांच्या संघटित ...

×