Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नेपाळने स्वीकारली नवी ऐतिहासिक राज्यघटना

नेपाळने स्वीकारली नवी ऐतिहासिक राज्यघटना

=ठिकठिकाणी हिंसाचार, एक ठार=
nepal new rajyaghatanaकाठमांडू, [२० सप्टेंबर] – नेपाळने आज रविवारी संपूर्ण धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राज्यघटना स्वीकारली आहे. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांनी संसद परिसरात याबाबतची घोषणा केली. दरम्यान, नव्या राज्यघटनेला विरोध करणारे राजकीय पक्ष आणि गटांनी घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी हिंसाचार सुरू केला असून, यात एकाचा मृत्यू, तर अनेक जखमी झाले आहेत.
सलग सात वर्षे चाललेल्या सल्लामसलतीच्या प्रक़्रियेनंतर नेपाळची राज्यघटना तयार करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा करताना राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव म्हणाले की, नेपाळी संसद आणि संसदेच्या अध्यक्षांनी मंजुरी दिलेली नवी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राज्यघटना आपण स्वीकारली आहे. देशवासीयांपुढे ही घटना आज मी सादर करीत आहे. आज, २० सप्टेंबरपासूनच ती लागू झाली आहे. हा क्षण ऐतिहासिक असाच असून, यात मी सर्वच राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे सहकार्य मागत आहे, असे त्यांनी संसद परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
आपल्या प्रत्येकाचे स्वातंत्र्य, देशाची भौगोलिक एकात्मता आणि नागरिकांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी ही राज्यघटना सक्षम आहे. नवी घटना स्वीकारण्यात आल्यामुळे आतापर्यंत चालत आलेली अंतरिम घटना आपोआपच रद्द झाली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, नवी घटना स्वीकारण्यात आल्यानंतर लगेचच देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेला विरोध करणार्‍या पक्षांनी आणि कट्टरवादी गटांनी ठिकठिकाणी जाळपोळ करीत, वाहतूकही रोखून धरली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारनेही सुरक्षा दलाचे हजारो जवान तैनात केले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23977

Posted by on Sep 21 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1435 of 2458 articles)


कोलकाता, [२० सप्टेंबर] - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे आज रविवारी येथे ...

×