Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

=भूकंपातील मृतांचा आकडा ४३५२ वर=
nepal bhukamp1cकाठमांडू, [२८ एप्रिल] – नेपाळ भूकंपातील संख्या आतापर्यंत ४३५२ च्याही वर गेलेली आहे. नेपाळमधील नागरिक कमालीचे घाबरून गेलेत. अशातच नेपाळला आज पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी झालेल्या भूकंपानंतर गेल्या तीन दिवसापासून सतत छोटे छोटे भूकंपाचे हादरे जाणवत होतेच त्यात काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून आज पहाटेही भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती. दरम्यान आणखी काही दिवस असे सौम्य हादरे जाणवतील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. नेपाळसोबतच पश्‍चिम बंगालमध्येही काल रात्री ५.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
८० वर्षातील हा नेपाळमधील सर्वात भयंकर भूकंप आहे. भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. भारतीय वायुदल अप्रतिम कामगिरी करत आहे. १० पेक्षा जास्त ‘एमआय – १७’ हेलीकॉप्टर नेपाळमध्ये दाखल आहेत. तसेच ३सी – १७ मालवाहू विमानं आणि ३ आयएल – ७६ मालवाहू विमानं तैनात आहेत. आतापर्यंत वायुदलाने ५४० भारतीयांना मायदेशी सुखरुप परत आणलंय.
मोबाईल कंपन्यांनीही घेतला पुढाकार
नेपाळमध्ये पुढील तीन दिवस बीएसएनएल नेटवर्कवरून केलेल्या दूरध्वनीसाठी स्थानिक दर आकारण्यात येणार आहे. तर एअरटेलने नेपाळमधील कॉल मोफत करण्याचा पुढाकार घेतला आहे.
दरम्यान वातावरण स्वच्छ झाल्यामुळे बचावकार्याला वेग येण्याची शक्यता आहे. नेपाळच्या विविध भागातून जखमी नेपाळी नागरिक आणि परदेशी नागरिकांनाही भारतात आणण्यात आलं. तसेच भारतीय वायूसेनेची विमानं नेपाळच्या नागरिकांसाठी रसद घेऊन रवाना झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22392

Posted by on Apr 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1735 of 2458 articles)


=‘ग्रीटेक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन= मुंबई, [२८ एप्रिल] - इस्त्राईलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील ‘ग्रीटेक’ या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे ...

×