Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नेपाळ पुन्हा हादरला

नेपाळ पुन्हा हादरला

=बिहारलाही धक्का, एक ठार, ५.७ इतकी तीव्रता=
nepalearthquakeकाठमांडू/पाटणा, [१६ मे] – गेल्या २५ एप्रिलच्या महाविनाशकारी भूकंपातून अजूनही पूर्णपणे न सावरलेल्या नेपाळला आज शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता ५.७ इतकी होती. तथापि, या भूकंपात कोणतीही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, बिहारच्या काही भागांनाही या भूकंपाचा धक्का बसला असून, पश्‍चिम चंपारण जिल्ह्यात मातीचे घर कोसळल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला.
शनिवारी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बसलेल्या या धक्क्याचा केंद्रबिंदू रामेछाप जिल्ह्यापासून उत्तरेकडे २४ किलोमीटर अंतरावर जमिनीच्या १० किलोमीटर आत होता. धक्का बसताच घाबरलेले लोक घरातून बाहेर आले आणि सुरक्षित ठिकाणांकडे सैरावैरा धावत सुटले.
बिहारला बसलेल्या भूकंपाची तीव्रताही ५.७ इतकीच होती, अशी माहिती भारतीय वेधशाळेने दिली. नेपाळला पहिला धक्का बसल्यानंतर काही वेळातच लहान ते मध्यम तीव्रतेचे आणखी सुमारे आठ धक्के बसले. पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीमलाही भूकंपाचे हादरे बसल्याचे वृत्त आहे.
२५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपात १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचे बळी गेल्यानंतर १२ मे रोजी नेपाळ आणि उत्तर भारत पुन्हा एकदा ७.६ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले होते. या दोन्ही धक्क्यांच्या कटू स्मृती अजूनही स्मरणात असताना, आज पुन्हा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22581

Posted by on May 17 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1693 of 2458 articles)


पंतप्रधानांचे उद्योगपतींना आवाहन २६ व्यावसायिक करारांवर स्वाक्षरी नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याचे फलित = शांघाय, [१६ मे] - पंतप्रधान नरेंद्र ...

×