Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेपाळ भूकंप केवळ ‘ट्रेलर’

नेपाळ भूकंप केवळ ‘ट्रेलर’

=महाविनाश तोंडावर! : भूगर्भाचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांचे मत=
nepal bhukamp mapनवी दिल्ली, [२७ एप्रिल] – नेपाळला गेल्या शनिवारी ७.९ इतक्या रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. या देशाचा मोठा भाग या भूकंपाने ढिगारा बनला आहे. सुमारे चार हजार लोकांचा यात बळी गेला. असंख्य घरांची पडझड झाली. तथापि, भूगर्भाचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांच्या मते, हे केवळ एक ‘ट्रेलर’ आहे. महाविनाश अगदी तोंडावर आहे. त्यामुळे शनिवारच्या भूकंपाला महाविनाशी भूकंप असे म्हणता येणार नाही.
हिमालयीन परिसरात जमिनीच्या खाली सुरू असलेल्या हालचालींचा सातत्याने अभ्यास करणारे कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील भूगर्भतज्ज्ञ रॉजर बिलहॅम यांच्या मते, केवळ ७.९ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने इतका मोठा विनाश केला. पण, त्याला हिमालयातील सर्वात मोठा विनाशकारी भूकंप म्हणता येणार नाही. तर, हिमालयाच्याच जमिनीतील हालचालींचे बारकाईने निरीक्षण करणारे आयआयटी खडगपूरचे प्राध्यापक शंकर कुमार नाथ यांनी भविष्यात होणार्‍या विनाशाचे अतिशय भीषण चित्र रेखाटले आहे.
जमिनीतून जी ऊर्जा बाहेर पडत आहे, त्या तुलनेत हा भूकंप मध्यम स्वरूपाचाच म्हणावा लागेल. हिंदूकुश प्रांत ते अरुणाचल प्रदेश हा २५०० किलोमीटरचा भाग अतिशय महाविनाशी भूकंपाच्या तोंडावर वसलेला आहे. कदाचित, भविष्यात जर आणखी एक भूकंप झाला, तर तो किमान ९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असेल आणि त्यात होणार्‍या प्राणहानीची कल्पनाही कुणी करू शकणार नाही, असे नाथ यांनी म्हटले आहे.
हिमालयाच्या या प्रांतात केवळ ७.९ तीव्रतेचाच भूकंप झाला, हे आपण नशीबच म्हणायला हवे. याच भूकंपाची तीव्रता जर ९ किंवा त्यापेक्षा जास्त असती, तर खरोखरच महाविनाश झाला असता. याच भागात १९३४ मध्ये ८.४ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि त्यात नेपाळ व भारतात १७ हजारांवर लोकांचा बळी गेला होता, असे ते म्हणाले.
सध्या काठमांडू येथे असलेले इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रमुख जेम्स जॅक्सन यांनीही अशाच प्रकारचा इशारा दला आहे. भूगर्भात किती वेगाने हालचाली सुरू आहेत, यावर विध्वंसाची भीषणता ठरत नसते, तर ज्या भागात मोठा भूकंप होतो, तिथे लोकसंख्या किती दाट आहे आणि पर्यावरणाचा किती र्‍हास झाला आहे, यावर भीषणता अवलंबून असते.
मे महिन्यात पुन्हा भूकंपाचा धोका : ज्योतिषतज्ज्ञ सचिन मल्होत्रा यांचा इशारा
गेल्या शनिवारी व त्यानंतर नेपाळमध्ये आलेल्या भूकंपातील बळींचा आकडा हजारोंच्या संख्येत पोहोचला असून, हा धोका अद्याप टळलेला नाही. मे महिन्याच्या दुसरा पंधरवडा आणखी धोकादायक ठरण्याची शक्यता असून, उत्तर भारत, काश्मीर, लडाख, पाकिस्तान आणि चीनच्या पश्‍चिम भागात मोठा भूकंप होऊ शकतो, असा इशारा प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ सचिन मल्होत्रा यांनी दिला आहे.
नेपाळपासून थेट महाराष्ट्र नागपूरपर्यंत हादरे बसलेल्या या भूकंपाचेे भाकीत मल्होत्रा यांनी गेल्या ४ एप्रिल रोजी झालेल्या चंद्रग्रहणाआधीच वर्तविले होते. त्यामुळे पुढील महिन्यातील संभाव्य भूकंपाच्या त्यांनी दिलेल्या इशार्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22326

Posted by on Apr 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1743 of 2453 articles)


=कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाचा मार्ग मोकळा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्तीही बेकायदेशीर= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरवून चार ...

×