Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » नौदलात वाढणार महिलांची संख्या

नौदलात वाढणार महिलांची संख्या

=युद्धाची जबाबदारी मात्र सध्याच नाही=
66th Republic Day paradeनवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – नौदलात महिलांना महत्त्वाची भूमिका पार पाडता यावी, तसेच महिलांची संख्या वाढावी, यासाठी भारतीय नौदलाने ठोस पुढाकार घेतला आहे. त्याचवेळी महिलांना सध्याच युद्धाची जबाबदारी देण्यात येणार नसल्याचेही नौदलाने स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांमध्ये वैमानिक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्‍वभूमीवर भारतीय नौदलाने घेतलेल्या या निर्णयाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
नौदलात महिलांकरिता स्थायी कमिशन असायलाच हवे, असा स्पष्ट निकाल देत, दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच नौदलाला कडक शब्दात जाब विचारला होता. न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णयही नौदलाने घेतला आहे. जिथे जहाजावर रात्रभर विमान ठेवणे आवश्यक असते, अशी स्थिती वगळता, विमानवाहू जहाज आणि उड्डाणांचे क्षेत्रच महिलांसाठी खुले करता येऊ शकते, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांना दिली. नौदल कमांडर्सच्या परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नौदलात महिलांकडे महत्त्वाची भूमिका सोपविण्याची आणि त्यांची संख्या वाढविण्याबाबतची घोषणा आगामी काही दिवसांतच करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
जहाजांवरून उड्डाण घेणार्‍या विमानांमध्ये वैमानिक म्हणून महिलांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नौदलाने अलीकडेच संरक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे, हे विशेष! दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर नौदलाने महिलांची भूमिका वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे, असा अर्थ यातून काढला जाऊ नये, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25339

Posted by on Oct 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1276 of 2453 articles)


ड, क, ब गटांकरिता मुलाखती बंद ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची घोषणा नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] - आकाशवाणीवरील आपल्या ‘मन ...

×