Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » न्यायमूर्तींचा सुनावणीस नकार; प्रकरण दुसर्‍याकडे सोपवा

न्यायमूर्तींचा सुनावणीस नकार; प्रकरण दुसर्‍याकडे सोपवा

=बाबरी मशिद प्रकरण=
SupremeCourtनवी दिल्ली, [१० मार्च] – भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपा व विहिंपच्या इतर नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणात असलेला फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप मागे घेण्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी नकार दिला.
या प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्यायासनाचे प्रमुख न्या. व्ही. गोपाल गौडा यांनी कोणतेही कारण न देता प्रकरणाच्या सुनावणीस नकार दिला आणि सरन्यायाधीशांनी हे प्रकरण दुसर्‍या न्यायासनाकडे सोपवावे, अशी विनंती केली. न्या. अरुण मिश्रा यांचाही या न्यायासनात समावेश होता.
हाजी मेहबूब अहमद आणि सीबीआयने अडवाणी, जोशी यांच्यासह १६ जणांविरुद्धचा फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप मागे घेण्याला विरोध म्हणून ही याचिका दाखल केली आहे.
बाबरी विध्वंस प्रकरणात भादंविच्या कलम १२० (ब) नुसार लावण्यात आलेला फौैजदारी स्वरूपाच्या कटाचा आरोप विशेष न्यायालयाने वगळला होता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने २० मे २०१० रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब कले होते. आपली निर्णय प्रक्रिया कोणाच्याही प्रभावाखाली असून, भाजपा नेत्यांविरुद्धचा फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप आपल्या म्हणण्यानुसार वगळण्यात आला नाही, असे सीबीआयने गेल्या सप्टेंबर महिन्यात न्यायालयाला सांगितले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27214

Posted by on Mar 10 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (701 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१० मार्च] - अनेक सार्वजनिक बँकांचे हजारो कोटी रुपये बुडविल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय माल्या यांना भाजपाप्रणीत रालोआ ...

×