Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » न्यायालयीन कारवाईशी भाजपाचा संबंध नाही: प्रसाद

न्यायालयीन कारवाईशी भाजपाचा संबंध नाही: प्रसाद

ravi-shankar-prasad-2नवी दिल्ली, [८ डिसेंबर] – भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि जनतेच्या पैशांची केलेली लूट लपवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष न्यायालयीन कारवाईचे निमित्त करीत संसदेत गोंधळ घालत असल्याचा आरोप केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकरप्रसाद यांनी आज पत्रपरिषदेत केला.
संसदभवन परिसरात कॉंग्रेसने घेतलेल्या पत्रपरिषदेला प्रत्युत्तर देत रविशंकरप्रसाद म्हणाले की, कॉंग्रेस नेत्यांवर न्यायालयाने समन्स बजावला आहे. ती पूर्णपणे न्यायालयीन कारवाई आहे, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. कॉंग्रेस आरोप करणार्‍यांबद्दल बोलत आहे, पण आरोपाबद्दल मात्र मौन बाळगून आहे. त्यामुळे हा एकप्रकारचा फौजदारी विश्‍वासघात आहे.
या प्रकरणाचा सीबीआयशी, दिल्ली पोलिसांशी आणि सरकारशीही दुरान्वयाने संबंध नाही, याकडे लक्ष वेधत रविशंकप्रसाद म्हणाले की, कॉंग्रेसची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली, यात राजकीय सूडबुद्धी कुठे आली. न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर कॉंग्रेस राजवटीतील एकही घोटाळा उघडकीस आला नसता. टुजी घोटाळा, कोलगेट घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार म्हणता येईल का? मग संसदेच्या कामकाजात अडथळा का आणला जात आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
२ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी हा सारा प्रकार करण्यात आला, असा आरोप करत रविशंकरप्रसाद म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशन करणारी असोसिएट जर्नल कंपनी २००८ मध्ये बंद पडली. या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. यंग इंडिया नावाच्या कंपनीने जिच्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ७५ टक्के शेअर होते, एसोसिएट जर्नल कंपनीच्या ९० कोटीच्या कर्जाची जबाबदारी घेण्याचे ठरवले. विशेष म्हणजे यासाठी कॉंग्रेस पक्षाने यंग इंडिया कंपनीला ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले. पुढे यंग इंडिया कंपनीने ५० लाख परत केले. दरम्यान कॉंग्रेसने यंग इंडिया कंपनीला दिलेले कर्जच माफ करून टाकले. हा आर्थिक घोटाळा नाही तर काय आहे?
कोण कोणाची सून आहे, वा जावई आहे, याचा न्यायालयीन कारवाईवर फार फरक पडत नाही, असे रविशंकरप्रसाद यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
जीएसटी देशाच्या हिताचे विधेयक आहे. जीएसटी पारित व्हावे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चाही केली आहे. मात्र, आता न्यायालयीन कारवाईचे निमित्त करत जीएसटीत अडथळा आणण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर आम्हालाही पाहावे लागले, असे रविशंकरप्रसाद यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला भाजपा सांसदीय पार्टीचे सचिव बालासुब्रमण्यम कार्मसू आणि प्रवक्ते श्रीकांत शर्मा उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26047

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1062 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ डिसेंबर] - नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावण्याच्या मुद्यावरून ...

×