Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पंचायत निवडणूक: कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धोक्याचे संकेत

पंचायत निवडणूक: कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धोक्याचे संकेत

Voting stampमुंबई, [१८ एप्रिल] – राज्यातील ११५१ ग्रामपंचायती आणि सहा नवनिर्मित नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे बालेकिल्ल्यांना धक्के बसले आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला गड कायम राखला. या निवडणुकीत नारायण राणे यांच्यासह आमदार नीतेश राणे यांनीही विशेष लक्ष घातले होते. याठिकाणी शिवसेनेला सहा जागी विजय मिळाला, तर प्रत्येकी एका जागेवर भाजपा व अपक्ष उमेदवार विजयी झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपंचायतीत शिवसेनेने ६ जागा जिंकून बाजी मारली. भाजपाला दोन जागी विजय मिळाला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले. माढा नगरपंचायत निवडणुकीतही रॉकॉंला मोठा हादरा बसला असून, भाजपाने पाठिंबा दिलेल्या दादासाहेब साठे गटाने ११ जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ जागा मिळाल्या. आमदार बबन शिंदे व त्यांचा पुतण्या संजय यांचा साठे गटापुढे निभाव लागला नाही. याठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगर पंचायतीत १७ जागांसाठी मतदान झाले होते. परंतु, निकालात याठिकाणी त्रिशंकू अवस्था बघायला मिळाली. भाजपाने पाठिंबा दिलेल्या संजीवनी पाटील गटाला ५, तर तुकाराम देशमुख यांच्या गटालाही पाचच जागी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मिलींद कुळकर्णी गटाने चार जागा जिंकल्या. माळशिरसचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. संजीवनी पाटील यांच्या गटातील अनुसूचित जातीचे सर्व तिन्ही उमेदवार निवडून आल्याने सत्ता याच गटाकडे राहाणार हे स्पष्ट आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा नगर पंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला. एकूण १७ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४, कॉंग्रेसला ३ व एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने ८ जागा जिंकल्या. कॉंग्रेसला ४, भाजपाला २ आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27877

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (472 of 2451 articles)


मुंबई, [१८ एप्रिल] - सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतकर्‍यांसाठी करण्यात आलेल्या आवश्यक तरतुदी शंभर टक्के पूर्णपणे संबंधित विभागांना उपलब्ध ...

×