पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला
Saturday, January 2nd, 2016=४ दहशतवादी ठार, २ जवान शहीद=
पठाणकोट, [२ जानेवारी] – जम्मू – पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर काल रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले असून दोन जवान शहीद झाले आहेत. याठिकाणी अजून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवाद्यांनी काल रात्री पंजाबमधील गुरूदासपूरचे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण केले होते. त्यानंतर मध्यरात्री ३ च्या सुमारास लष्कराच्या वेशात असलेल्या ४ ते ५ दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले असून अजूनही याठिकाणी चकमक सुरूच आहे. त्यानंतर जम्मू – पठाणकोट महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. सध्या सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या जवानांनी हवाई तळाच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. लष्कराच्या विशेष पथकाचे जवानही या कारवाईत सहभागी आहेत. तसेच लष्कराची चार हेलिकॉप्टर्स या कारवाईत सामील झाले आहेत.
अद्यापही काही दहशतवादी हवाई दलाच्या इमारतीत लपले असून त्यांच्याकडून गोळीबार सुरूच आहे. या हल्ल्यामागे जैशे -ए – मोहमद या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले आहेत. तर दोन जवान शहीद झाले आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीची बैठक बोलाविली आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=26366

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!