पंतप्रधानांकडे शेतकर्यांसाठी वेळच नाही
Tuesday, May 19th, 2015=राहुल गांधी यांचा आरोप, सरकारला दिले दहापैकी शून्य गुण=
अमेठी, [१८ मे] – अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट यामुळे देशातील शेतकरी हतबल झाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अमेरिका, कॅनडा, चीन, मंगोलिया, जर्मनी यासारख्या देशांचे दौरे करीत आहेत. त्यांच्याकडे शेतकर्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजिबात वेळ नाही, असा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी आज सोमवारी अमेठी या आपल्या लोकसभा मतदारसंघांच्या दौर्यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. दौर्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काही शेतकर्यांची भेट घेतली आणि अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सतत विदेश दौरे करणारे आणि देशातील शेतकर्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार्या मोदी सरकारला मी दहापैकी शून्य गुण देत असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले.
अमेठीकरिता आपण फूड पार्कचा प्रस्ताव सादर केला होता. यामुळे अनेक जिल्ह्यांचा विकास झाला असता. पण, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला. हा प्रकल्प माझ्याकरिता नव्हता, तो शेतकरी आणि गरिबांकरिता होता. हा भव्य फूड प्रकल्प रद्द करून मोदी सरकार माझ्यावर राजकीय सूड उगवत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकार माझा बदला घेत आहे. पण, यात शेतकर्यांचे नुकसान होत आहे. अशा प्रकारचे राजकारण सरकारने करू नये, अशी माझी विनंती आहे. शेतकर्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी सतत परदेश दौर्यावरच असतात. देशातील शेतकरी कोणत्या समस्यांचा सामना करीत आहेत, हे पाहण्यासाठी ते शेतकर्यांच्या घरी कधीच गेले नाहीत. कारण, त्यांच्याजवळ शेतकर्यांसाठी वेळच नाही. त्यांचे सरकार उद्योगपतींचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22604

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!