Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम थांबवा: कॉंग्रेस

पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम थांबवा: कॉंग्रेस

modi at airनवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम इतका लोक प्रिय आहे की याचा परिणाम बिहारमधील विधानसभा निवडणूकीवर होऊन लोकांचे मत भाजपालाच जातील की काय अशी धास्ती कॉंग्रेसने घेतली आहे. म्हणून कॉंग्रेसने बिहारमधील निवडणूक होईपर्यंत मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम थांबविण्यात यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्यात रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधतात आणि सरकारचे विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती देतात. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणार्‍या सूचनांनाही प्राधान्य देऊन त्यानुसार काही बदलही करतात. त्यामुळे या कार्यक्रमाला नागरिकांनी विशेष पसंती दिली आहे. तसेच केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती या कार्यक्रमातून दिली जाते. याचा परिणाम निवडणुकीत लोकांच्या मतांवर होऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसने बिहारमधील निवडणूक होईपर्यंत या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारीत म्हटले आहे की, पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय प्रचार करत आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे.
मात्र, सूत्रांनी याबाबत सांगितले आहे की, या कार्यक्रमावर बंदी घालणे शक्य नाही. असे उत्तर आयोगाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23818

Posted by on Sep 16 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1469 of 2453 articles)


बीड,[१५ सप्टेंबर] - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला बॉलिवूड पूढे आला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता बॉलिवूडचा ...

×