Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » पंतप्रधानांची नेताजी, बाळासाहेबांना श्रद्धांजली

पंतप्रधानांची नेताजी, बाळासाहेबांना श्रद्धांजली

=सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती प्रेरणादायी=
narendra-modi-namaskarनवी दिल्ली, [२३ जानेवारी] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती आणि शौर्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायीच आहे. त्यांचे संघटनात्मक आणि नेतृत्त्व कौशल्य यांना तोड नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नेताजी केवळ शूर नव्हते, तर त्यांच्यातील धैर्य आणि नेतृत्वक्षमता अद्‌भुत अशीच होती. अनेक पिढ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेच त्यांच्यातील कौशल्य होते. त्यांचे व्यक्तिमत्व आगळेच होते. त्यांची आज शुक्रवारी जयंती आहे. भारतमातेच्या या सुपुत्राला मी अभिवादन करतो, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बाळासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणाकरिता आणि त्यांना हक्क मिळवून देण्याकरिता वेचले. ते नेहमीच आमच्या हृदयात विराजमान राहतील, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20005

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2184 of 2453 articles)


=पंतप्रधान होण्यासाठीच कॉंगे्रसशी हातमिळवणी : अमित शाहंचा नितीशकुमारांवर हल्ला= पाटणा, [२३ जानेवारी] - याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या बिहारमध्ये भाजपाचे ...

×