पंतप्रधानांच्या दौर्यांमुळे भारताची गुंतवणूक वाढली
Wednesday, September 23rd, 2015नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी केलेल्या परदेश दौर्यांमुळे भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय)मध्ये मोठी भर पडली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महत्वाच्या केलेल्या दौर्यांमुळे अनेक देशांमधून १.३ लाख कोटी रूपये एवढी थेट परकीय गुंतवणूक देशात आली आहे.
ऑक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत गुंतवणूक ४८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतात एकं दर ३०.९३ डॉलरची एफडीआय झाली. मात्र नरेंद्र मोदींच्या विशेष प्रभावाने गुंतवणुकीचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश एवढे आहे. तसेच यंदाची गुंतवणूक २७ टक्क्यांनी अधिक आहे. त्यानंतर मोदींनी ‘मेक इन इंडिया’ हा कार्यक्रम सुरू केल्यानंतरही ‘एफडीआय’ चा वेग वाढला.
येत्या बुधवारी नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला पोहोचणार असून याठिकाणी अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. दरम्यान, जगातील महत्वाच्या उघोगांच्या सीईओंची भेट घेण्याच्या नियोजनामुळेच हा मोठा बदल घडून आला आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=24025

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!