Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधानांनी गठित केले चार मंत्र्यांचे पथक

पंतप्रधानांनी गठित केले चार मंत्र्यांचे पथक

=भारतातील भूकंपाचा आढावा=
NARENDRA MODI 16नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – नेपाळ आणि उत्तर भारतात सतत दोन दिवस बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये झालेल्या प्राण व वित्तहानीचा आढावा घेण्यासाठी तसेच सुरू असलेल्या मदत व बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी चार वरिष्ठ मंत्र्यांचे पथक गठित केले.
विनाशकारी भूकंपाचा तडाखा बसलेल्या नेपाळमध्ये भारतातर्फे सुरू असलेल्या मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना रवाना केले आहे. त्यानंतर त्यांनी भारतातील भूकंपात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याची जबाबदारी अनंत कुमार, राधामोहन सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्यावर सोपविली आहे.
या भूकंपाचा सर्वाधिक फटका बिहारला बसला असून, हे तीनही मंत्री सर्वप्रथम बिहारचा दौरा करणार आहेत. एकूण नुकसानाचा आढावा घेतानाच, तिथे सुरू असलेल्या मदत व बचाव मोहिमेवरही ते लक्ष ठेवणार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत चर्चा करून आपला अहवाल हे मंत्री पंतप्रधानांना सादर करतील.
भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी या बैठकीत उपस्थित होते. पंतप्रधान मात्र या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.
भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपाच्या सर्व खासदारांनी आपले एक महिन्याचे वेतन राष्ट्रीय आपात निधीत जमा केले आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनीही आपले एक महिन्याचे वेतन भूकंपपीडितांसाठी दिले आहे, असे नायडू यांनी सांगितले. भारत आणि नेपाळमधील भूकंपात बळी पडलेल्यांवर या बैठकीत दु:ख व्यक्त करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22382

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1733 of 2453 articles)


=५.५ इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत= पेशावर, [२८ एप्रिल] - नेपाळ आणि भारत सलग तीन दिवस महाविनाशी भूकंपाने हादरल्यानंतर आज ...

×