Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधानांनी बांगलादेशचा पुरस्कार अटलजींना सोपविला

पंतप्रधानांनी बांगलादेशचा पुरस्कार अटलजींना सोपविला

narendra-modi-नवी दिल्ली, [११ जून] – बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्या देशाने माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांना दिलेला बांगलादेश लिबरेशन वॉर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी अटलजींकडे सुपूर्द केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी गेले आणि बांगलादेश सरकारने दिलेला पुरस्कार अटलजींची मानस कन्या नमिता भट्टाचार्य व त्यांचे पती रंजन भट्टाचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यादेखील याप्रसंगी उपस्थित होत्या. बांगलादेश मुक्तीसंग्राम आणि दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात केलेल्या योगदानाबद्दल बांगलादेशने अटलजींचा या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव केला होता. आपल्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यात अटलजींच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. आज अटलजींची भेट घेतली आणि बांगलादेश लिबरेशन वॉर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करताना खूप आनंद झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी नंतर ट्विट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22842

Posted by on Jun 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1628 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ जून] - आमच्या जवानांना मारणार्‍या बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये जाऊन केलेल्या कारवाईमुळे बदललेल्या मानसिकतेचे दर्शन ...

×