Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पंतप्रधानांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधानांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

narendra modi33नवी दिल्ली, [१७ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर यावर्षी त्यांचा हा दुसरा वाढदिवस आहे. सोशल मिडियामध्ये मोदी यांचा वाढदिवस मोठ्‌या प्रमाणात साजरा करण्यात आला असून राजधानी दिल्लीसह देशात अनेक शहरांमध्ये नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. तर सुरतमध्ये भव्य केक बनविण्यात आला असून स्वच्छ भारत अभियानांचेही आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टि्‌वटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारताची फुलराणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने वापरलेले रॅकेट तिने नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिले आहे. सायनाने दिलेल्या या अनोख्या भेटीबद्दल मोदींनी आपल्या टि्‌वटरवरून तिचे आभार मानले आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. त्यामध्ये सरकारचे योगा, आरोग्य, पायाभूत सुविधा कौशल्य विकास आणि कन्याशक्ती या पाच उपक्रमांचा ‘पंच क्रांती अभियान’ म्हणून प्रसार करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23853

Posted by on Sep 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1459 of 2453 articles)


=लालू, नितीश, कॉंग्रेसला झटका, सपा, राकॉं यांचा समावेश= लखनौ, [१७ सप्टेंबर] - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न ...

×