Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पंतप्रधान करणार मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन

पंतप्रधान करणार मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन

=गुंतवणुकीसाठी राज्यात मोठ्या संधी : फडणवीस=
modi-fadnavisमुंबई, [८ फेब्रुवारी] – महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून पायाभूत सुविधांसह अनेक सोयी-सवलती दिल्या आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी उपलब्ध असून ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या माध्यमातून उद्योगांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी येथे केले. येत्या १३ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे या सप्ताहाचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत येत्या १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या निमित्ताने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे आयोजित ‘कर्टन रेझर’ पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, केंद्रीय उद्योग धोरण विभागाचे सचिव अमिताभ कांत, सहसचिव अतुल चतुर्वेदी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, संजय किर्लोस्कर आदी उपस्थित होते.
‘मेक इन महाराष्ट्र’ झाल्याशिवाय ‘मेक इन इंडिया’ पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाने ‘मेक इन इंडिया’च्या शुभारंभासाठी महाराष्ट्राची निवड केली ही गौरवाची गोष्ट आहे. जगभरातून येणार्‍या प्रतिनिधींसमोर ‘मेक इन इंडिया सप्ताहा’चा कार्यक्रम यशस्वी व अविस्मरणीय करण्यासाठी महाराष्ट्र व मुंबई सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्‍वास आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक व सांस्कृतिक राजधानी आहे. अशा प्रकारचे मोठे जागतिक प्रदर्शन भरविण्याची मोठी क्षमता मुंबईमध्ये आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’साठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहामध्ये महाराष्ट्राची गुंतवणूक क्षमता सार्‍या जगाला दाखवून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक राज्यात यावी, यासाठी राज्य शासनाने पंतप्रधानांच्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत उद्योगांच्या परवानग्यांची संख्या कमी केली आहे. तसेच सर्व परवाने व अर्ज हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्यात येत असून, ‘सिंगल विंडो सिस्टीम’मधून सर्व विभागांच्या परवानग्या उद्योगांना कमीत कमी वेळेत मिळावेत यासाठी धोरण आखले आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी उद्योग विभागाची ‘मैत्री’ योजना राबवित आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26798

Posted by on Feb 9 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (838 of 2451 articles)


=गुंतवणूक आणि दहशतवाद रोखण्यास प्राधान्य= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - अबुधाबीचे राजे शेख मोहंमद बिन झायद अल् नाहायन् हे येत्या ...

×