Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना मागे टाकले

पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना मागे टाकले

=देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत=
Modi-Jinpingबीजिंग, [१९ मार्च] – एका चिनी कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर तोडगा काढण्याच्या बाबतीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मागे टाकले आहे.
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका, भारत, रशिया, ब्राझील आणि चीन या नऊ देशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार २०१४ या वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांचा निपटारा करण्यात पंतप्रधान मोदी अव्वल राहिले. दुसर्‍या स्थानावर चीनचे अध्यक्ष जिनपिंग आहेत. चीन इंटरनॅशनल पब्लिशिंग ग्रुपचे उपाध्यक्ष वांग गंजाई यांनी बीजिंग येथे बुधवारी सर्वेक्षणाचे निष्कर्ष जारी केले.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी जिनपिंग यांनी केलेल्या प्रयत्नांचे खूप कौतुक झाले. परंतु, या कौशल्यात जिनपिंग यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसरे स्थान मिळाले. या सर्वेक्षणात नऊ देशांच्या साडेचार हजार लोकांनी सहभाग घेतला. चायना फॉरेन लँग्वेज पब्लिशिंग ऍडमिनिस्ट्रेशन, मिलवार्ड ब्राऊन आणि लाईटस्पीड जीएमआयचे आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र या संस्थांनी मिळून हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात चीनचे मित्रराष्ट्र अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मात्र सहभागी करून देण्यात आले नाही. जागतिक समुदायात बीजिंगची प्रतिमा चांगली असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले, असे गंजाई यांनी या सर्वेक्षणानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षांबाबत माहिती देताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21602

Posted by on Mar 20 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1877 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१९ मार्च] - विदेशात जमा केलेला पैसा आणि संपत्तीची माहिती न देणे हा सत्यविधान गुन्हा ठरविण्यासह दहा वर्षांच्या ...

×