Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » पंतप्रधान मोदींमध्ये नेताजींचे गुण : चंद्र बोस

पंतप्रधान मोदींमध्ये नेताजींचे गुण : चंद्र बोस

chandra kumar bose2कोलकाता, [२६ मार्च] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेताजी सुभाषचंद्र बोससारखी योग्यता असून दोघांमधील अनेक गुण समसमान आहेत, असे प्रतिपादन सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी केले आहे. पश्‍चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्र बोस राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. चंद्र बोस यांना भाजपाने भवानीपूर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
याआधी नेताजींची तुलना कोणाशी करताना मला जर भीतीच वाटत होती. आता मात्र मला हे सांगताना अजीबात भीती वाटत नाही की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात असलेले अनेक गुण पंतप्रधान मोदींमध्ये आहेत, असेही चंद्र बोस एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हणाले. भाजपाशी माझे कौटुंबिक संबंध असल्याचेही बोस यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात चंद्रकुमार यांचे वडील अमिय कुमार बोस चार वर्षेपर्यंत पश्‍चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष होते. आमच्या कुटुंबातील इतरही काही सदस्य कॉंग्रेस, फॉर्वर्ड ब्लॉक आणि तृणमूल कॉंग्रेसमध्येही असल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आपला मानस असून मोदींच्या नेतृत्वातच ते शक्य असल्याचे चंद्र बोस म्हणाले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या पाच मिनिटे आधी झालेल्या भेटीदरम्यान नेताजींच्या संदर्भातील काही फाईली सार्वजनिक करण्याची मी विनंती केली होती. माझ्या अर्जावर मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर तातडीने कारवाई केली. यात त्यांनी कोणतेही राजकारण केले नाही. याउलट ममता बॅनर्जी यांच्याकडेही मी फाईल जाहीर करण्याबाबत आग्रह केला होता. त्यांनी काही फाईली जाहीरही केल्या होत्या. मात्र, त्याचा त्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापर केला, अशी माहितीही चंद्र बोस यांनी यावेळी दिली.
ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवून तुम्हाला बळीचा बकरा करण्यात आले आहे का, असे विचारले असता बोस म्हणाले की, असे मला अजीबात वाटत नाही. मी जिंकणार आहे आणि नेताजींच्या विचारांचा प्रचार करणार आहे. नेताजींचे विचार दाबण्याचा कॉंग्रेसने पूर्ण प्रयत्न केला, असे सांगून बोस म्हणाले की, भाजपाला बदनाम करण्यासाठीच विरोधी पक्ष आणि मीडियाने उगाचच असहिष्णुतासारख्या मुद्यांवर जास्तच चर्चा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27600

Posted by on Mar 27 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (562 of 2452 articles)


=विकास, जलदविकास, सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध= तिनसुखिया, [२६ मार्च] - आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण ...

×