पंतप्रधान मोदी मायदेशी परतले
Saturday, April 18th, 2015नवी दिल्ली, [१८ एप्रिल] – आपल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात जागतिक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा नऊ दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी सकाळी मायदेशी परतले. भाजपातील अनेक वरिष्ठ नेते यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.
फ्रान्सपासून आपल्या दौर्याचा प्रारंभ करताना मोदी यांनी या देशासोबत ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण करार केला. जर्मनीतही त्यांनी मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुकीला आकर्षित केले. दौर्याच्या तिसर्या आण शेवटच्या टप्प्यात कॅनडासोबत मोदी यांनी भारताला युरेनियमचा पुरवठा करण्यासह विविध महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्या केल्या. कॅनडाहून मायदेशी परतताना मोदी यांनी येथील भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
दिल्लीतील पालम विमानतळावर शनिवारी सकाळी नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय, विजय गोयल यांच्यासह काही भाजप नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भाजपा कार्यकर्तेही मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22172

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!