Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी यांनी केली विरोधी सदस्यांची विचारपूस

पंतप्रधान मोदी यांनी केली विरोधी सदस्यांची विचारपूस

modi-swamy-rajya-sabhaनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विरोधी बाकांवरील सदस्यांची विचारपूस करीत नवा पायंडा पाडला. दरम्यान, आज मोदी यांच्या उपस्थितीत पाच सदस्यांनी शपथ घेतली.
राज्यसभेचे कामकाज सुरू व्हायला काही मिनिटे असताना पंतप्रधान मोदी सभागृहात आले आणि आपल्या जागेवर बसण्याऐवजी ते विरोधी बाजूच्या बाकांकडे गेले. यामुळे सदस्यांना सुरुवातीला आश्‍चर्य वाटले. सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध हॉकीपटू आणि बिजदचा सदस्य दिलीप तिर्की याची भेट घेत विचारपूस केली. नंतर मोदी यांनी तृणमूल कॉंग्रेसचे सुखेंदू शेखर यांना हात जोडून अभिवादन केले. माकपाचे सीताराम येचुरी यांच्या खांद्यावर हात ठेवत मोदी त्यांच्याशी काहीवेळ बोलले. येचुरी यांच्या बाजूला बसलेल्या बसपा नेत्या मायावती यांना अभिवादन करत मोदी यांनी बसपाचेच सतीशचंद्र मिश्रा यांच्याशी हस्तांदोलन केले. मोदी यांनी नंतर कॉंग्रेसच्या बाजूला जात ए. के. ऍण्टोनी आणि आनंद शर्मा यांच्याशीही काही क्षण संवाद साधला. आपल्या जागेकडे परत येताना मोदी यांनी प्रमोद तिवारी यांनाही अभिवादन केले.
सभागृहाचे कामकाज आज सुरू होताच सभापती हमीद अन्सारी यांनी पाच सदस्यांना शपथ दिली. यात चार नामनियुक्त सदस्यांचा समावेश होता. आज शपथ घेणार्‍यांमध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता आणि महिला बॉक्सर मेरी कोम यांचा समावेश होता. सुखदेवसिंह धिंडसा यांनीही आज शपथ घेतली. सर्व सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना हात जोडून अभिवादन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27999

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय (436 of 2453 articles)


=राज्यसभेत कामकाज स्थगित= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - उत्तराखंड आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि ...

×