Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पंतप्रधान मोदी सौदीत दाखल

पंतप्रधान मोदी सौदीत दाखल

=दहशतवादविरोधात व्यापक आघाडी उघडणार=
pm modi in riyadhरियाध, [२ एप्रिल] – बेल्जियम आणि अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी सौदी अरबमध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या या दौर्‍यात द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढविण्यासोबतच दहशतवादविरोधी लढ्यासाठी दोन्ही देशांची धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत करण्यावर पंतप्रधानांचा भर राहणार आहे.
दहशतवाद आणि कट्टरवाद या दोन्ही धोक्यांचा सामना करण्याचा मुद्दा नरेंद्र मोदी आणि सौदी नरेशांच्या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होणार आहे. विशेष म्हणजे, इस्लामसाठी पवित्र देश मानल्या जाणार्‍या सौदीने अलीकडेच दहशतवादविरोधी लढ्यासाठी ३४ मुस्लिम देशांची व्यापक आघाडी उघडली आहे. जगात तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक देश असलेल्या सौदी अरब आणि भारतातील मैत्रीचे संबंध गेल्या दोन दशकांपासून सातत्याने वृद्धिंगत होत आहेत.
आपल्या या दौर्‍याच्या काळात पंतप्रधान मोदी सौदी नरेश सलमान बिन अब्दुल अझीज अल् सौद तसेच अन्य नेत्यांसोबत द्विपक्षीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय, सौदीचे राजकुमार आणि गृहमंत्री मोहम्मद बिन नैफ व संरक्षण मंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. उद्या रविवारी सायंकाळी पंतप्रधान मायदेशी रवाना होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27671

Posted by on Apr 3 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (542 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२ एप्रिल] - आसाम आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार आज शनिवारी थंडावला आहे. या दोन्ही ...

×