Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान १३ मार्चपासून श्रीलंका दौर्‍यावर

पंतप्रधान १३ मार्चपासून श्रीलंका दौर्‍यावर

  • २५ वर्षात पहिला द्विपक्षीय दौरा
  • संसदेला संबोधित करणार

NARENDRA MODI ON TURनवी दिल्ली, [५ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ मार्चपासून तीन दिवसांच्या श्रीलंका दौर्‍यावर जाणार असून, दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकन संसदेला ते संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा श्रीलंका दौरा भारतीय पंतप्रधानाने गेल्या २५ वर्षात केलेला पहिला द्विपक्षीय दौरा असेल आणि त्यामुळे त्यांच्या या दौर्‍याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार १३ मार्चला श्रीलंकन संसदेला संबोधित केल्यानंतर नरेंद्र मोदी १४ मार्चला महाबोधिया येथे भेट देतील. याशिवाय तामीळ अल्पसंख्यकांची संख्या जास्त असलेल्या जाफना शहरालाही ते भेट देणार आहेत. १९८७ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दौर्‍यानंतर भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष मेत्रिपाला सिरिसेना यांच्या भारत दौर्‍यानंतर महिनाभरातच पंतप्रधान मोदी श्रीलंका दौर्‍यावर जात आहेत. सिरिसेना यांनी आपला पहिला भारत दौरा यशस्वी झाल्याचे म्हटले होते. भारत सरकारसोबत चार महत्त्वाचे करार केल्यानंतर गेल्या १८ फेब्रुवारीला सिरिसेना मायदेशी परतले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21139

Posted by on Mar 6 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1966 of 2453 articles)


मंगळुरु, [५ मार्च] - मंगळुरुतील यंत्रसामग्रीचे व्यावसायिक वरदराज कमलक्ष नायक यांनी आपल्या कामगारांना सुखद धक्का दिला आहे. पुणे स्थित कंपनीचे ...

×