Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान १६ ऑगस्टपासून युएई दौर्‍यावर जाणार

पंतप्रधान १६ ऑगस्टपासून युएई दौर्‍यावर जाणार

=दुबईत भारतीय समुदायातर्फे होणार भव्य सत्कार=
narendra modi19नवी दिल्ली, [९ ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत. गेल्या ३४ वर्षांत अमिरातचा दौरा करणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करणे, हाच त्यांच्या दौर्‍याचा मुख्य उद्देश राहणार आहे. १६ ऑगस्ट रोजी अबुधाबी येथे आगमन झाल्यानंतर येथील क्रिकेट स्टेडियमवर दुबईतील भारतीय समुदाय समितीकडून पंतप्रधानांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान दुबईला रवाना होणार आहेत.
यापूर्वी, १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त अरब अमिरातला भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान युएईचा दौरा करणार असल्याने त्याला दोन्ही देशांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी अमिरात सरकारनेही विशेष तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय समुदाय समितीच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दुबई क्रिकेट स्टेडियमवर पंतप्रधानांच्या होणार्‍या सत्कारासाठी सर्वच भारतीय नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. फेसबुक पेज व इंटरनेटवरूनही निमंत्रण पाठविण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23610

Posted by on Aug 11 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1522 of 2453 articles)


गया येथील रॅलीत पंतप्रधानांचे आवाहन अहंकार, अन्यायापासून मुक्ती देणारी विधानसभा निवडणूक परिवर्तन हाच सर्वोत्तम मार्ग गया, [९ ऑगस्ट] - ...

×