Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » पं. रविशंकर यांना ‘डुडल’च्या माध्यमातून मानवंदना

पं. रविशंकर यांना ‘डुडल’च्या माध्यमातून मानवंदना

pt.ravishankar google-doodleनवी दिल्ली, [७ एप्रिल] – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक भारतरत्न पंडीत रविशंकर यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ ने ‘डुडल’ च्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने सर्च इंजिनवर एका उभ्या ठेवलेल्या सतारसोबत वेलीच्या सहाय्याने गुगल हे अक्षर लिहिण्यात आले आहे. त्यावर कर्सर नेल्यावर पंडीत रविशंकर यांचा ९६ वा वाढदिवस असे वाक्य इंग्रजीत दिसते.
पंडीत रविशंकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सतारसाठी समर्पित केले होते. त्यांनी १९४९ ते १९५६ या काळात रेडिओसाठी संगीतकार म्हणून त्यांनी काम केले होते. भारतात त्यांनी अनेक कार्यक्रम केले असून युरोप, अमेरिकेमध्येही त्यांनी सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. तसेच जगातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल व्याख्यानेही दिली होती. त्यांच्यामुळे युवा पिढीतील अनेक तरूण सतार वादनाकडे आकर्षित झाले.
केंद्र सरकारने १९९९ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. त्यापूर्वी त्यांना ‘पद्मभूषण आणि पद्मविभूषण’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते. दरम्यान, पंडीत रविशंकर यांचे २०१२ मध्ये अमेरिकेत निधन झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27741

Posted by on Apr 7 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (516 of 2453 articles)


नवी दिल्ली, [६ एप्रिल] - माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी श्रीमती कमला अडवाणी ...

×