Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पगार कमी होणार, पीएफ वाढणार

पगार कमी होणार, पीएफ वाढणार

=वेतनात सर्व भत्ते एकत्रित करण्याचा केंद्राचा प्रस्ताव, मसुदा विधेयक तयार=
EPFO-Indiaनवी दिल्ली, [१३ मार्च] – कर्मचार्‍यांचे भवितव्य आणखी सुरक्षित करण्याच्या दिशेने केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. ज्या कर्मचार्‍यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) दर महिन्याला विशिष्ट रक्कम जमा होते, त्यांचा ईपीएफमधील वाटा आणखी वाढविण्यात येणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा पगार कमी होण्याची शक्यता असली, तरी ईपीएफमधील जमा रक्कम वाढणार असल्याने भविष्याची चिंता कमी होणार आहे.
कर्मचार्‍यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच केंद्र सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी विद्यमान कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबतचे मसुदा विधेयक सरकारने तयार केले आहे. सध्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडूनही तेवढ्याच रकमेची भर घातली जाते.
नव्या मसुदा विधेयकानुसार, मूळ वेतनातच विविध भत्ते एकत्रित करून येणार्‍या रकमेवर पीएफची कपात केली जाणार आहे. या प्रस्तावामुळे कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यातील जमा रकमेत मोठी भर पडणार असली, तरी महिन्याला त्याच्या हातात वेतनाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम कमी होणार आहे. यावर उपाय म्हणून काही क्षेत्रातील उद्योग वा कंपन्यांना पीएफचा वाटा कमी ठेवण्याची सूट दिली जाणार आहे. ईपीएफ कायद्यातील सुधारणांचा हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच आला होता. मात्र, उद्योग जगताच्या विरोधामुळे तो मागे पडला. आता पुन्हा केंद्र सरकार यावर विचार करत आहे. विशेष म्हणजे, मूळ वेतनाच्या केवळ १२ टक्केच कपात व्हावी, ही सक्ती काढण्यात येणार असून, २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांनाही ईपीएफ कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21405

Posted by on Mar 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1921 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ मार्च] - १६/१२ रोजीच्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांड घटनेवर बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने तयार केेलेल्या लघुपटाच्या ...

×