Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पठाणकोट हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण

पठाणकोट हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण

=भाजपाचा आरोप=
prakash_javadekarनवी दिल्ली, [२ जानेवारी] – पाकिस्तानसोबत सरकारने जी शांतता प्रक्रिया सुरू केली आहे, ती एका हल्ल्याने थांबणार नाही, असे स्पष्ट करताना, पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचे कॉंग्रेस पक्ष राजकारण करीत आहे, असा आरोप भाजपाने आज शनिवारी कॉंग्रेसवर केला.
पाकसोबतच शेजारील सर्वच देशांसोबत शांततेचे आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. दहशतवाद हा चर्चेतील मुख्य मुद्दा आहे. पाकवर दबाव आणण्यावरही सरकारने भर दिला आहे. भारतातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी पाकसोबत चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी यांनी बसने लाहोर दौरा केला होता. त्यावेळी आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, अशी ठोस ग्वाही पाकमधील राज्यकर्त्यांनी जगाला दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लाहोरला भेट दिली व मैत्रीचा हात पुढे केला. त्यामुळे आपल्या देशातील भूमीतून भारतविरोधी दहशतवादी कारवाया होणार नाही, याची काळजी घेण्याची आणि जगाला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची जबाबदारी पाकिस्तानचीच आहे, असेही जावडेकर म्हणाले.
आपण मित्र बदलवू शकतो, पण शेजारी नाही. पाकिस्तान हा आपला शेजारी आहे. त्यामुळे पाकसोबत चर्चेची प्रक्रिया आपल्याला सुरूच ठेवावी लागेल. भारतविरोधी दहशतवादी कारवाया पाकच्याच भूमीतून सुरू असल्याने आपल्याला आणखी प्रभावीपणे हा मुद्दा उपस्थित करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26378

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (950 of 2453 articles)


=नकवी यांची माहिती= बरेली, [२ जानेवारी] - उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार ...

×