Home » गोवा, ठळक बातम्या, राज्य » पणजी महापालिकेत भाजपाचा पराभव

पणजी महापालिकेत भाजपाचा पराभव

=मोन्सेराट पॅनेलला स्पष्ट बहुमत=
panaji-municipal-corporationपणजी, [८ मार्च] – गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला पणजी या राजधानीच्या शहरातील महानगर पालिकेची सत्ता गमवावी लागली आहे. पणजी महानगर पालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंगे्रसचे बंडखोर नेते ऍटान्सिओ मोन्सेराट यांच्या पॅनेलने ३० पैकी १७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपाला केवळ १३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला भोपळाही फोडता आला नाही.
वर्षभरातच गोवा विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पणजी महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात होते. आतापर्यंत या महापालिकेवर भाजपाचीच सत्ता होती. पण, नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी भाजपाची कुठलीही पिछेहाट झाली नसल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. ही स्थानिक निवडणूक आहे, असे सांगताना गोव्यात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
या महापालिकेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. एकूण ७५ टक्के मतदान झाले होते. मडगाव पाठोपाठ पणजी महापालिकेतही भाजपाचा पराभव झाल्याने भाजपा सरकारसाठी हा एक इशाराच असल्याचे मानले जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27117

Posted by on Mar 9 2016. Filed under गोवा, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गोवा, ठळक बातम्या, राज्य (733 of 2452 articles)


मुंबई, [८ मार्च] - जागतिक महिला दिन आज जगभरात साजरा होत आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहे. ...

×