Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » पत्रकाराच्या हत्येचे तार राजदपर्यंत?

पत्रकाराच्या हत्येचे तार राजदपर्यंत?

=शहाबुद्दिनच्या खास साथीदाराला अटक=
rajdev-ranjan-siwan_ ranjan dev journalistसिवान, [१५ मे] – पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येचे तार आता थेट बिहारमधील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलापर्यंत पोहोचले आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यात कारागृहात असलेला राजदचा खासदार मोहम्मद शहाबुद्दिनचा खास साथीदार उपेंद्र सिंह याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.
उपेंद्र सिंह याला २०१४ मध्येही एका हत्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी भाजपाचे खासदार ओम प्रकाश यादव यांचे मीडिया सल्लागार श्रीकांत भारती यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची सुपारी देखील उपेंद्र सिंहनेच चवन्नी सिंह नावाच्या शार्प शूटरला दिली होती. चवन्नी सिंहला गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात अटक करण्यात आली होती. गोरखपूर येथील कारागृहातून तीन दिवसांपूर्वीच त्याला सिवान मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी त्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येची सुपारी शहाबुद्दिननेच दिली असावी, असा पोलिसांना संशय आहे. शहाबुद्दिनच्या आदेशानुसारच चवन्नी सिंहने आपल्या साथीदारांकडून रंजन यांची हत्या केली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अन्य एका घडामोडीत घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणार्‍या राधेश्याम नावाच्या एका अभियंत्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रपती राजवट हाच पर्याय : पासवान
हत्या व बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच आता एकमेव पर्याय आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज पाटण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. एकाच आठवड्यात आदित्य सचदेव या तरुणाची आणि पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या झाली. काही दिवसांपूर्वी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यालाही गोळ्या घालण्यात आल्या होत्या. राज्यात जंगलराज परत आल्याचेच हे द्योतक आहे, असे पासवान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28266

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (343 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१५ मे] - शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने बांगलादेशसोबत अणुकरारावर स्वाक्षरी केली ...

×