Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पनामा पेपर्समध्ये सैफ-करिना, धूत यांचेही नाव

पनामा पेपर्समध्ये सैफ-करिना, धूत यांचेही नाव

NOSSACK FONSECAनवी दिल्ली, [७ एप्रिल] – देशभरात गाजत असलेल्या पनामा पेपर्स प्रकरणामध्ये अनेक नामवंत व्यक्तींसह आता सैफ अली खान, त्याची पत्नी करिना कपूर यांचेही नाव आहे. तसेच करिश्मा कपूर आणि व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांचेही नाव यादीत असल्याचे समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय संघटना आयसीआयजेची पनामा देशातील कायदेविषयक सल्लागार कंपनी मोसेक फोन्सेकाची कागदपत्रे सार्वजनिक केल्यानंतर गौप्यस्फोट झाला आहे.
आयपीएलची पुणे फ्रँच्याईझी मिळवण्यासाठी मार्च २०१० मध्ये १० लोकांनी कन्सोर्शियम तयार केली. यामध्ये सैफ, करिना, करिश्मा व वेणुगोपाल यांचा समावेश होता. त्यानंतर एक एमओयु साईन करून पी-व्हीजन स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी तयार केली. या कंपनीत सर्व १० लोकांची भागिदारी होती. ही कंपनी ब्रिटीश व्हर्जिन आयर्लंडमध्ये नोंदणीकृत होती. विशेष म्हणजे आयपीएलची फ्रँच्याईझी खरेदी केल्यानंतर ही कंपनी बंद करण्यात आली.
या फ्रँच्याईझी मागील सत्य असे की, यात ३३ टक्के भागिदारी क्रोडिया कुटुंबियांची होती. व्हिडियोकॉनचे वेणुगोपाल यांनी २४.५ टक्के भागिदारी व्हिडियोकॉन इंडस्ट्री लि.च्या नावाने खरेदी केली. तर ५ टक्के भागिदारी व्हिडियोकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नावाने खरेदी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27753

Posted by on Apr 8 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (514 of 2458 articles)


१५ दिवसांत लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा •स्वतःचे पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न : खडसे मुंबई, [७ एप्रिल] - चार-चार मुख्यमंत्री मराठवाड्याचे ...

×