Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » परकीय गुंतवणुकीत भारत पहिल्या क्रमांकावर

परकीय गुंतवणुकीत भारत पहिल्या क्रमांकावर

=चीन, अमेरिकेलाही टाकले मागे=
narendra modi in irelandनवी दिल्ली, [३० सप्टेंबर] – परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळविण्यात भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यात जूनपर्यंत भारतामध्ये तब्बल ३० अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे.
गेल्या वर्षी भारत पाचव्या क्रमांकावर होता. त्यानंतर मोदी सरकारने परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक उपक्रम सरकारने सुरू केले आहे. त्यासोबतच पंतप्रधान मोदी हे स्वतः विदेशी दौरे करून तेथील उद्योगपती आणि सीईओंची भेट घेऊन त्यांना भारतात व्यवसाय करण्यास आवाहन करत आहेत. याचाच फायदा म्हणून चीनपेक्षा ४ अब्ज आणि अमेरिकेपेक्षा ३ अब्ज डॉलर्सची अधिक गुंतवणूक भारतानं आणली आहे. मागच्यावर्षी पहिल्या सहा महिन्यात १२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली होती. यंदा ही गुंतवणूक दुप्पट झाली आहे. अशी माहिती फायनशियल टाइम्स वर्तमानपत्राच्या डेटा सर्व्हीसने दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24134

Posted by on Sep 30 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1386 of 2453 articles)


=तर ७ जणांना जन्मठेप= मुंबई, [३० सप्टेंबर] - ११ जुलै २००६ रोजी मुंबईला हादरवणार्‍या साखळी बॉम्बस्फोटातील निकाल आज लागला असून ...

×