Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » परस्परांविषयी द्वेषभावना ठेवू नका

परस्परांविषयी द्वेषभावना ठेवू नका

=राजनाथसिंह यांचे आवाहन=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – विविध धर्म, परंपरा आणि संस्कृतींनी नटलेल्या आपल्या देशात एकमेकांच्या समाजाविषयी द्वेषभावनांना कुठेही स्थान नाही. गुन्हेगार कोणत्याही जाती वा धर्माचे असो, कारवाई करताना पक्षपात होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज बुधवारी, धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या काही राजकीय पक्षांवर प्रचंड आगपाखड केली.
दादरी, फरिदाबाद आणि पंजाबमधील घटनांमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या देशभरात आपण दसर्‍याचा सण साजरा करणार आहोत. असत्यावर सत्याचा विजय, असे या सणाचे प्रतीक असल्याने, याच अनुषंगाने मी ऐक्याचे आवाहन करीत आहे, असे राजनाथसिंह यांनी राजकीय विषयावरील नव्या ‘थिंक टँक’चे उद्‌घाटन करताना सांगितले.
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधून देशातील काही घटनांवर सातत्याने प्रकाश टाकण्यात येत आहे. देशात असहिष्णूता वाढत असल्याचे मीडियातील वृत्त खरोखरच गंभीर आणि चिंताजनक आहे. दसर्‍याच्या पूर्वसंध्येला मी देशवासीयांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात ‘संपूर्ण विश्‍वच आमचे कुटुंब’ हा संदेश देणारा भारत हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. त्यामुळे जात, धर्म आणि भाषेच्या नावाखाली असहिष्णूतेची भावना वाढीस लागेल, असे कोणतेही कृत्य आपण करायला नको, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.
दादरी, फरिदाबाद आणि पंजाबमध्ये अलीकडील काळात घडलेल्या घटना दुर्दैवी अशाच आहेत. पण, केवळ व्होटबँकेसाठी या घटनांवरून राजकारण करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न अशोभनीय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25243

Posted by on Oct 22 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1306 of 2453 articles)


=औद्योगिक कामगारांसाठी खुशखबर= नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] - दिवाळी तोंडावर असतानाच, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी औद्योगिक कामगारांना आनंदाची बातमी दिली ...

×