Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पर्यावरणाचे नुकसान केल्यास पाच कोटी दंड

पर्यावरणाचे नुकसान केल्यास पाच कोटी दंड

EnvironmentBillनवी दिल्ली, [२८ मार्च] – पर्यावरणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. असे नुकसान करणार्‍यांकडून यापुढे पाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो.
यासाठी केंद्र सरकार एक संशोधन विधेयक आणण्यावर विचार करीत आहे. सध्या पर्यावरणाचे नुकसान करणार्‍यास एक लाख रुपयांचा दंड करण्यात येतो. पण या नवीन संशोधनानुसार दंडाची रक्कम वाढवून ती पाच कोटी करण्यात येणार आहे. तसेच दंडाशिवाय पाच वर्षे शिक्षा केली जाते, ती पण वाढवून सात वर्षे करण्याची योजना आहे. हे नवीन विधेयक संसदेच्या २५ एप्रिल ते १३ मे दरम्यान होणार्‍या अधिवेशन काळात मांडले जाणार आहे.
एवढेच नाही तर या विधेयकात अधिकतम दंडाची रक्कम २० कोटी, त्याशिवाय आजीवन कारावासाची शिक्षा करण्याबाबत तरतूद करण्यात येणार आहे. जर पर्यावरणाला पोहोचवलेल्या हानीची भरपाई एकाच वेळी करणे शक्य होणार नसेल तर एक कोटी प्रतिदिन या हिशेबाने अतिरिक्त दंड वसूल करण्यात येणार आहे.
या संशोधित विधेयकाला विधि मंत्रालयाने आधीच मंजुरी दिली असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. सध्या हे विधेयक पर्यावरण मंत्रालयाकडे असून ते कॅबिनेटसमोर मांडण्यात येणार असून नंतर ते संसदेत मांडले जाणार आहे. वर्तमान पर्यावरण (सुरक्षा) कायदा-१९८६ आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल ऍक्ट-२०१० मध्ये सुधारणा कण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
दंडापोटी मिळणारी रक्कम पर्यावरण सुधारणा तसेच प्रदूषित जागांचा विकास करण्यात खर्च केली जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27617

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (558 of 2453 articles)


=अरुण जेटली यांचा मल्ल्याला इशारा= नवी दिल्ली, [२८ मार्च] - बँकांचे कर्ज सन्मानपूर्वक परत करा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, ...

×