Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पर्रीकर पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर

पर्रीकर पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर

manohar-parrikar9नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर शनिवारपासून पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर असून, या दौर्‍यात ते चीनच्या राजकीय व संरक्षण नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरवर युनोच्या माध्यमातून निर्बंध आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने अडथळा आणल्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकर यांच्या या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिकेसोबत संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी करार करण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर होत असलेल्या पर्रीकर यांच्या चीन दौर्‍यात लष्करी संबंध सुधारण्यावर आणि विशेष करून सीमाप्रश्‍नावर चर्चा होईल, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्राने सांगितले. २०१३ नंतर चीनचा दौरा करणारे मनोहर पर्रीकर हे पहिले संरक्षणमंत्री आहेत. यापूर्वी ए. के. ऍण्टोनी यांनी चीन दौरा केला होता.
३,४८८ किमी लांबीच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत याबाबत चर्चेच्या १८ फेर्‍या झाल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27836

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (487 of 2453 articles)


=दुष्काळी भागात पाणी माफियांचा असाही ‘उद्योग’= नांदेड, [१६ एप्रिल] - मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत ...

×